आ. वैभव नाईक आणि सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांचे आयोजन
स्पर्धेचे दहावे वर्ष
मालवण : मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्त्यां तथा युवती सेना कुडाळ मालवण प्रमुख पदाधिकारी सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून गेली दहा वर्षे मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी या स्पर्धेला प्रतिसाद वाढत आहे. विविध जिल्ह्यातील स्पर्धक यात सहभागी होतात. यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक तसेच सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या एकत्रित सहभागातून मोठया उत्साहात आयोजित केली जाणार आहे. जिल्ह्यातील मानाची व भव्यदिव्य स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. यावर्षी १९ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे खास आकर्षण असलेला सोन्या-चांदीने मढविलेला नारळ, सोन्याचे नाणे, सोन्याची नथ यांचा अंतर्भाव असलेला विजेता चषक तसेच सोन्याचे नाणे, सोन्याची नव असलेला उपविजेता चषक पासह अन्य सोन्या, चांदीची बक्षिसे यानिमित्ताने महिलांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती शिल्पा यतीन खोत यांनी शिवसेना तालुका कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेच्या निमित्ताने माझी इरकली तर्फे अनेक नवनवीन कलेब्शन यानिमित्ताने महिलांना पाहायला मिळणार असल्याचेही सौ. खोत यांनी स्पष्ट केले.
स्वराज्य ढोलपथकाच्या गजरात स्पर्धा रंगणार आहे. यावेळी दीपा शिंदे, पूनम चव्हाण, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, माधुरी प्रभू, आर्या गावकर, तन्वी भगत, स्वाती तांडेल, साक्षी मयेकर, दीपा पवार, ज्योती तोडणकर, मानसी घाडीगावकर, लक्ष्मी शिरसेकर, निनाक्षी मेथर, नीना मुंबरकर आदी महिला भगिनी उपस्थित होत्या, तसेच शिवसेना पदाधिकारी मंदार केणी, यतीन खोत, बाबी जोगी, नंदू गवंडी, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते.
जिल्हयात आता सर्वत्र महिलांचा सहभाग असलेल्या नारक लढविणे स्पर्धा मोठ्या संख्यने आयोजित केल्या जात आहेत. मात्र, दहा वर्षांपूर्वी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महिला भगिनींना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे, या हेतूने या स्पर्धेचे प्रथम मख्य आयोजन केले. विजेत्या, उपविजेत्यांवर सोन्या-चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव करणारी ही स्पर्धा जिल्हयातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेला लक्षवेधी दर्जा प्राप्त करून देण्यात शिल्पा खोत व त्यांच्या सहकारी यशस्वी ठरल्या आहेत. यावर्षी स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्या-चांदीने मढविलेला नारळ, सोन्याचे नाणे, सोन्याची नथ, तर उपविजेतीला सोन्याचे नाणे, सोन्याची नथ तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला सोन्याची नथ तसेच अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्चकांना चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्थक व प्रेक्षक यांच्यासाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले असून विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत,
स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत, ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आदीची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग दर्शविणाऱ्या पहिल्या दोनशे महिलांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत, असेही सौ. खोत यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे शिल्पा खोत, च्या निनाक्षी शिंदे, आर्या गावकर, नंदा सारंग, तन्वी भगत, निना मुंबरकर किंवा बना ९४२२५८४६४१ येथे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

