मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचा आक्रमक इशारा
ब्युरो न्यूज : गेली १७ वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले अवस्थेत आहे. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहे. जे काम पूर्ण झाले आहेत त्याची अवस्था ही वाईट आहे. त्यामुळेच दररोज अनेक अपघात होत आहेत.
संबंधित मंत्री नेते आश्वासन देतात मात्र रस्ता दुरुस्तीचे काम हे होताना दिसत नाही. त्यामुळेच मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी मुंबई व महामार्ग जन आक्रोश समिती अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. म्हणूनच या सर्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण छेडण्याचा मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीने दिला आहे.
माणगाव एसटी स्टँड येथे या समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलनाला आता कवी, साहित्यिक , कलाकार मंडळी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. कवी लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सुद्धा आपला जाहीर पाठिंबा या आंदोलनास व्यक्त केला आहे तसेच सर्व साहित्यिक आणि कलाकार यांनीही आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

