Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

आर्थिक अपहार, अनियमितता प्रकरणी कोळंब सरपंच सिया धुरी व ग्रामसेवकांवर शासन निर्णयानुसार तात्काळ कारवाई करा….

उपसरपंच विजय नेमळेकर व सदस्यांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

संबंधितांवर शासन निर्णयानुरुप फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी

सिंधुदुर्ग : कोळंब ग्रामपंचायत आर्थिक अपहार अनियमितता प्रकरणी सरपंच सिया धुरी व ग्रामसेवक प्रकाश सुतार यांच्यावर शासन निर्णयानुसार तात्काळ कारवाई व्हावी. अशी मागणी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, सदस्य संजना शेलटकर, स्वप्नील परब, संपदा परब, नंदा बावकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी विभाग अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदन पत्रात म्हटले आहे, आम्ही खाली सह्या करणारे ग्रा. पं. सदस्य असून आमची मागणी अशी आहे की, ग्रामपंचायत कोळंब येथील झालेल्या आर्थिक व्यवहारात सरपंच सिया धुरी व ग्रामसेवक प्रकाश सुतार यांचेकडून रु. ४,५२,४९६/- इतक्या रक्कमेची अनियमितता व अपहार होऊन रु. ३२,०१५/- एवढी रक्कम वसूलपात्र ठरत आहे. तरी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांचेवर शासन निर्णयानुरुप संदर्भिय पत्रानुरुप आर्थिक अपहाराची संबंधितांकडून तात्काळ वसुली करण्यात यावी, तसेच संबंधितांवर शासन निर्णयानुरुप फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद सिंधुदुर्ग विभाग येथील अधिकारी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच विजय नेमळेकर, सदस्य संजना शेलटकर, स्वप्नील परब, संपदा परब, नंदा बावकर आदी उपस्थित होते.

कोळंब सरपंच यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम नुसार कार्यवाही करणे करता चौकशी अहवाल सादर करणेत आला आहे.

सरपंच ग्रामपंचायत, कोळंब हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम नुसार कर्तव्य कसूरी समजून त्यांचेवर कलम ३९ अन्वये च्या तरतुदीप्रमाणे कारवाईस पात्र आहेत. सदर प्रकरणी असणा-या अनियमिततेस सरपंच व ग्रामसेवक है प्रामुख्याने जबाबदार दिसून येतात. सबब सरपंच ग्रामपंचायत कोळंब यांनी केलेली कृती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३८ प्रमाणे सोपविलेली कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडण्यास हेतू पुरस्कर कसूर करणारी आहे. तसेच ग्रामसेवक यांचेवर कारवाई सुरु आहे. त्यामुळे प्रकरणी सरपंच ग्रामपंचायत कोळंच यांचेचर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे गृहीत धरुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम अन्वये कारवाईस पात्र आहेत असे अभिप्राय आहेत.
तरी उचित कार्यवाहिस्तव अहवाल सविनय सादर करण्यात येत आहे. या स्वरूपातील सविस्तर अहवाल सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या वतीने कोकण आयुक्त कार्यालय यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत माहितीही उपसरपंच विजय नेमळेकर यांनी दिली आहे.

ruchira top