कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा आरोप
कुडाळ | प्रतिनिधी : माणगाव खोऱ्यावर विद्यमान सत्ताधारी यांनी अन्याय केला आहे. माणगाव आंबेरीच्या अप्रोच रोडला बजेट मध्ये गेल्या अडीज वर्षात निधी दिला नाही.
दुकांनवाड पूल आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केले, मात्र निवडणूक आल्यावर सत्ताधारी यांच्याकडून उदघाटन करण्यात आले. मात्र ६ महिने उलटून अद्याप वर्क ऑर्डर दिलेली नाही. असे आरोप कुडाळचे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केले आहेत.
पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री नसून ते फक्त काही ठिकाणचे असल्यासारखे असल्यासारखं वागत आहेत. खा. राणे, अन्य सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही अपेक्षित निधी प्राप्त झाला नाही.
त्याचबरोबर आंजिवडे घाटाच्या बाबतीत शब्द देऊनही पालकमंत्री यांच्याकडून निधी उपलब्ध झाला नाह. मात्र केसरी व अन्य रस्त्यासाठी ३६५ कोटी रुपये निधी देण्यात आला.
माणगाव खोऱ्यात भाजपच्या माध्यमातून अपेक्षित विकास झालं नाही. अनेकांना वैयक्तिक नुकसानभरपाई मिळाली नाही, मात्र सत्ताधारी समर्थक यांना वैयक्तिक नुकसानभरपाईचा फायदा झाला, अश्या शब्दात युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी टीका केली आहे.

