Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

निधी केळुसकर आणि अर्शीन शेख ठरल्या 'सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार'

' चिमणी पाखरं ' संस्थेचं आयोजन

यंदाचे स्पर्धेचे पाचवे वर्ष

कुडाळ | प्रतिनिधी: 'शोध नव्या नृत्य कलाकारांचा' या टॅग लाईन खाली शासनमान्य संस्था 'चिमणी पाखरं' आयोजित सिंधुदुर्ग डान्सिंग सुपर स्टार स्पर्धेमध्ये निधी केळुसकर आणि अर्शीन शेख या संयुक्तरित्या विजेत्या ठरल्या आहेत. कुडाळच्या मराठा समाज सभागृहात गेले अनेक आठवडे सुरु असलेल्या या स्पर्धेची रविवारी सांगता झाली.

रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होती. याच उदघाटन सुप्रसिद्ध उद्योजक अनंतरराज पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि पाटकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि नटराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालं.

यावेळी अनंतराज पाटकर, रोहन तांडेल, उमेश वेंगुर्लेकर, राहुल कदम, संजय कोरगावकर, प्रमोद नाईक, सौ. मुळ्ये, नागेश नेमळेकर, विजय सावंत, संजना परब, श्री .शेख, रवी कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा आणि चिमणी पाखर संस्थेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. यंदाचं हे स्पर्धेचं पाचवं वर्ष होत. सुमारे ६० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. लहान, मध्यम आणि मोठा अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

यामध्ये परीक्षक म्हणून चिमणी पाखर संस्थेचे संचालक रवी कुडाळकर, दीक्षा नाईक, संजना पवार,अभिषेक चव्हाण, निखिल कुडाळकर यांनी काम पाहिलं. सर्वच स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केली.

सायंकाळी उशिरा हि स्पर्धा संपली त्यांनतर मान्यवरांच्या उपास्थितीत निकाल जाहीर करण्यात आला.

लहान गटातून प्रथम क्रमांक - स्फूर्ती खांबले, द्वितीय क्रमांक - अदिती परब आणि ऋचा परब, तृतीय क्रमांक - स्वराली हरम आणि मंत्रा कोळंबकर यांनी मिळविला तर आराध्या मळेकर, लावण्या राऊळ, श्लोक जंगम आणि रिद्धी नार्वेकर याना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

माध्यम गटातून प्रथम क्रमांक - हेमांगी जाधव, द्वितीय क्रमांक- सई राऊळ / सान्वी मोरजकर, तृतीय क्रमांक - चैत्रा चव्हाण आणि रुता मार्गी यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन निधी नाईक, तन्वी परब, जान्हवी पावसकर यांना गौरविण्यात आलं. मोठ्या गटातुन प्रथम -प्राची पाटकर, द्वितीय-युक्ती हळदणकर आणि पियुषा पेडणेकर, तृतीय-निविदा चौगुले आणि प्राची जाधव यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन लोकेश अणावकर, यशस्वी शेलटे, चिन्मयी सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांनतर रवी कुडाळकर यांनी डान्सिंग सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टारची घोषणा केली. निधी केळुसकर आणि अर्शीन शेख या संयुक्त विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्यांना, रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं.

संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव, शुभम धुरी, नागेश नेमळेकर आणि राहुल कदम यांनी केलं. कार्यक्रमाला स्पर्धक, पालक, रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

ruchira top