Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

रोटरीच्या समरगीत स्पर्धेत मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा व ओझर विद्यामंदिर विजेते

स्पर्धेला मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जुबेर खान | मालवण : स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब मालवण तर्फे 'शालेय समरगीत समूहगायन २०२४' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेस मालवण तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर ने प्रथम क्रमांक पटकावला.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा लिमये हॉस्पिटलचे रोटरीयन डॉ. अजित लिमये व डॉ. लीना लिमये यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेत प्राथमिक गटात ६ शाळा तर माध्यमिक गटात ११ शाळा अशा एकूण १७ शाळांच्या संघांतून १९२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सर्व सहभागी शाळांच्या मुलांनी विविध समरगीते उत्तमरित्या सादर केली. स्पर्धेचे परीक्षण श्री. संजय आठले, श्री. शाम तेंडोलकर (दोन्ही कुडाळ) यांनी केले तर सूत्रसंचालन रो. प्रदीप सामंत, रो. सुविधा तिनईकर, सौ. श्वेता पंकज पेडणेकर व रो. महादेव पाटकर यांनी केले.

प्राथमिक गट प्रथम क्रमांक मोहनराव परुळेकर टोपीवाला प्राथमिक शाळा, द्वितीय पारितोषिक ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तृतीय क्रमांक भंडारी प्राथमिक शाळा तर उतेजनार्थ पारितोषिक कन्याशाळा प्राथमिक शाळेला देण्यात आले. तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक ओझर विद्यामंदिर कांदळगाव , द्वितीय क्रमांक टोपीवाला हायस्कूल, तृतीय क्रमांक रेकोबा माध्यमिक विद्यालय तर उत्तेजनार्थ पारितोषिक कन्याशाळा माध्यमिक शाळेला देण्यात आले.आणि सर्वोत्कृष्ट वादक पारितोषिक टोपीवाला प्राथमिक शाळेचे सुधीर गोसावी यांना देण्यात आले. सर्व विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते रोख रुपयांची पारितोषिके व डॉ. लिमये चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच या वर्षीपासून दोन्ही गटातील प्रथम आलेल्या मुलांना मेडल्स आणि वादकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच रोटरी क्लब तर्फे सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष रो. रमाकांत वाक्कर, रो. डॉ. लीना लिमये, रो. डॉ. अजित लिमये, रो. प्रदीप जोशी, रो. नीलम जोशी, रो. सुविधा तिनईकर, रो. महादेव पाटकर, सौ. गौरी पाटकर, रो. प्रसन्नकुमार मयेकर, सौ. नीलम मयेकर, सौ. श्वेता पंकज पेडणेकर, रो. प्रदीप सामंत, रो. अभय कदम, रो. संजय पेंडुरकर, रो. तनिष्का कासवकर, रो. अवि नेरकर, रो. अमरजित वनकुद्रे, रो. उमेश सांगोडकर, रो. भाऊ साळगांवकर, रो. बाळु तारी, रो. रंजन तांबे, रो. संदेश पवार, सौ. पवार, रो. हेमेंद्र गोवेकर, रो. सुहास ओरसकर, रो. संजय पेंडुरकर, श्री. महेश काळसेकर, कु. यशश्री वरक, कु. दिप्ती घागरे आदी उपस्थित होते.

ruchira top