Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

घोडे, चित्ररथ, मर्दानी खेळ, शिमगोत्सव आणि विविध वेशभूषा

घोडे, चित्ररथ, मर्दानी खेळ, शिमगोत्सव आणि विविध वेशभूषा

भगव्या उत्साहात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने आयोजन

फोवकांडा पिंपळ येथे सादर होणार नेत्रदीपक समारोप सोहळा

मालवण : घोडे, चित्ररथ, देखावे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूर येथील शिमगोत्सव, विविध वेशभूषा यांसह ढोल ताश्याच्या गजरात भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे 23 वे वर्ष आहे. दर वर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे.

दरम्यान, सायंकाळी 7:30 वा. फोवकांडा पिंपळ मालवण येथे कोल्हापूर करवीर येथील मर्दानी खेळ व नेरूर येथील शिमगोत्सव सोहळ्याचे भव्य दिव्य सादरीकरण होणार आहे. नेत्रदीपक असा हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

वेशभूषा स्पर्धा

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्ताने याही वर्षी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी असे बाल गट व शालेय गट असणार आहेत. तर खुल्या गटात पुरुष व महिला असे दोन गट (पारंपरिक वेशभूषा) असणार आहेत. चार गटात ही स्पर्धा होणार असून प्रत्येक गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

स्पर्धकांची भरड दत्त मंदिर येथे स्वागत यात्रे पूर्वी सायंकाळी 4 ते 5 यां वेळात उपस्थित राहून नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी अमिता निवेकर : 9923921507, बंटी केनवडेकर मोबा : 9422596682, अनिकेत फाटक : 9421646390,
यांच्याशी संपर्क साधावा. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक अमित खोत व भाऊ सामंत यांनी केले आहे.

ruchira top