कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी नोंदवला सहभाग…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन कार्यालय सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा 'जनता दरबार' पार पडला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील ७४९ पेक्षा जास्त नागरिकांनी या जनता दरबारात सहभाग नोंदविला. याठिकाणी एकूण ३५९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २८६ अर्ज तत्काळ निकाली निघाले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

