मालवण पोलिसांकडून अधिक तपास सुरु
मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली मधली वाडी येथील दुर्वेश लक्ष्मण धुरी (वय 25) बेपत्ता झाला आहे. याबाबत तक्रार मालवण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
तारकर्ली मधली वाडी येथील दुर्वेश लक्ष्मण धुरी हा दिनांक 11 ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता आहे. दुर्वेश हा आपण बाहेर जातो, असे आईला सांगून निघाला होता. तो घरी आलाच नाही. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नाही. १२ ऑगस्टला त्याची आई दिव्या लक्ष्मण धुरी ( वय ५० वर्ष) यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. यासंबंधीचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखली डी.व्ही. जानकर करत आहेत.

