कणकवली : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव उपस्थित होते.

