भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मालवण नगरपरिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जुबेर खान | मालवण : हर घर तिरंगा अभियान व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या दिनानिमित मालवण नगरपरिषदेने दिनांक 09 ऑगस्ट 2024 ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी मालवण नगरपरिषद यांच्या वतीने सकाळी 11.00 वाजता तिरंगा बाईक रॅली निघणार आहे. सदरची तिरंगा बाईक रॅली नगरपरिषद कार्यालय येथून भरड मार्गे बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ येथून नगरपरिषद कार्यालय येथे पूर्ण होणार आहे. तसेच दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत मामा वरेरकर नाटयगृह येथे " हर घर तिरंगा यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तरी सदर कार्यक्रमामध्ये नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.
तसेच मालवण नगरपरिषद व स.का. पाटील कॉलेज एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 6.00 ते 8.30 वाजता मालवण शहरातून मशाल फेरी आणि तिरंगा रॅली काढणेत येणार आहे. सदरची मशाल फेरी व तिरंगा रॅली सिंधुदूर्ग महाविद्यालय- मामा वरेरकर नाट्यगृह- भरड नाका बाजारपेठ मार्गे- फोवकांडा पिंपळ टोपीवाला हायस्कूल कन्याशाळा मार्गे सिंधूदुर्ग महाविद्यालय असा असणार आहे. तरी या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात मालवण येथील सर्व नागरिक विविध संस्था, शाळा कॉलेज विद्यार्थी, शिक्षक सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने यामध्ये तिरंगा हातामध्ये घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन मालवण नगरपालिका मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी केले आहे.

