वायरी बांध ग्रामविकास मंडळ यांचे आयोजन
जुबेर खान | मालवण : शिवसेना पुरस्कृत भव्य स्वरूपातील मुख्यमंत्री नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन दत्त मंदिर, वायरी बांध येथे 17 ऑगस्ट दुपारी 2 वा. ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक १०,००१ रुपये, द्वितीय क्रमांक ५,००१ रुपये, तृतीय क्रमांक २,५०१ रुपये देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची प्रवेश फी ३०० रुपये असून स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून पाच नारळ दिले जाणार आहेत.

स्पर्धेचे अन्य नियम हे स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी हर्षद पारकर - 9209774328 , शिवम हिर्लेकर - 8275075710, कमलाकांत पारकर -9422040597 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

