संदेश युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सिंधू प्रज्ञाशोध परीक्षेत दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत
भाऊ भोगले | बागायत : संदेश युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सिंधू प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. शाळा वडाचापाटने घवघवीत यश संपादन केले आहे. कु. पूर्वा देविदास पालव इ. 3 री, कु .यज्ञेश संतोष परब, इ. 7 वी या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
संदेश युवा प्रतिष्ठान तर्फे आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा मालंडकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. प्रकाश पवार, सौ. सानिका पालव, सौ. सेजल परब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

