माळगाव, बागायत तिठा येथे स्पर्धा आयोजन
मालवण : भाजप पुरस्कृत, चेतन साळकर आणि मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य स्वरूपातील नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन माळगाव, बागायत तिठा येथे करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 2,000, द्वितीय पारितोषिक 1000 व आकर्षक चषक असे स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी 50 रुपये असून प्रथम 60 स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेसाठीची नाव नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी केली जाणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन चेतन साळकर व मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

