विविध विषयांवर सकारात्मक चर्चा : सर्वांनी मानले निलेश राणे यांचे आभार
मालवण | प्रतिनिधी : सुरक्षेच्या नियमांचे प्राधान्याने पालन करून शाळेच्या मुलांची ने आण करणाऱ्या मालवणातील खाजगी गाडयांना बहुतांश वेळा वाहतूक स्तरावरील अधिकाऱ्यांकडून तपासणी त्रास सहन करावा लागतो. यामुळे मुलांना शाळेत वेळेत पोहचवताना अडचणी येतात. या प्रश्नी गाडी चालक मालक यांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेऊन समस्या मांडली.
दरम्यान, गावागावातून तसेच शहरात काही अंतरावरून मुलांची शाळेत ने आण करण्यासाठी आपण देत असलेल्या सेवेमध्ये आपल्याला अडचण निर्माण होणार नाही. याची काळजी आम्ही घेऊ असे सांगत निलेश राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गाडी चालक मालक यांची भूमिका मांडली. एकूणच सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती गाडी चालक मालक यांनी दिली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, संदीप भोजणे, संतोष गावकर यांसह गाडी चालक मालक सदस्य प्रमोद भोगावकर, ज्ञानदेव चव्हाण, व्ही के जावकर, कॅलीस डिसोजा, वैभव केरकर, विजय पोळ, राजन कुमठेकर, प्रवीण वस्त, अरुण सारंग, दिनेश सुर्वे, गणेश कुमठेकर, चेतन पोळ यासह अन्य उपस्थित होते. सर्वांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.

