Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषेला ३ ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामुळे ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून, तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

यावर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमा निमित्त निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय मराठी भाषेच्या संवर्धन व समृद्धी या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, कवी तसेच भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे.

ruchira top