भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपातील नारळ लढवणे स्पर्धा आयोजन
महिला भगिनींसाठी ही स्पर्धा | फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, सोन्याची नथ व अन्य पारितोषिक
नारळी पौर्णिमा उत्सव निमित्ताने बंदर जेटी येथे भव्यदिव्य आयोजन
जुबेर खान | मालवण : भाजपच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपात नारळ लढवने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या वतीने भव्यदिव्य स्वरूपातील नारळ लढवणे स्पर्धा 19 ऑगस्ट रोजी बंदर जेटी मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
पुरुष गटातील स्पर्धेसाठी एक लाख बक्षीस तसेच अन्य पारितोषिक असणार आहेत. संपर्क ललित चव्हाण : 9096728048

तसेच महिला भगिनींसाठी फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन सन्मानचिन्ह तसेच लकी ड्रॉ सोन्याची नथ, चांदीचा करंडा, छल्ला. यांसह अन्य बक्षिसे. महिला शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर : 8180986833, : तन्वी परब : 7588117805 यांच्याशी संपर्क साधावा.
भाजपा मालवण शहरप्रमुख बाबा मोंडकर यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, ललित चव्हाण, संदीप शिरोडकर उपस्थित होते.

