Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

वैभववाडीत काजू उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीचा फटका

वैभववाडीत काजू उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीचा फटका

काजू बागायतदार एकवटले : तात्काळ पंचनामा करुन नुकसानभरपाई द्या

वैभववाडी | प्रतिनिधी: वैभववाडी तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त बागायतीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या. या मागणीचे निवेदन वैभववाडीतील काजू बागायतदार यांनी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना दिले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी काजू उत्पादनावर अवलंबून आहेत. यावर्षी काजू पिकाला सुरुवातीला मोहोर चांगल्या प्रमाणात आला होता. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती.

मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यात सतत ढगाळ वातावरण, धुके आणि बदलते हवामान यामुळे काजू पिकावरील मोहोर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. परिणामी काजू उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काजू हे तालुक्यातील प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त काजू उत्पादकांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रति हेक्टर किमान २ लाख ५० हजार रुपयांची मदत मंजूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांनाही काजू बागायतदारानी निवेदन दिले.
तहसिलदार यांना निवेदन देतेवेळी काजू उत्पादक विनोद आयरे, राजू पवार, एकनाथ पवार, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, विनोद गुरव, राजेश मटकर, अजितसिंह काळे, सूर्यकांत बोडके, गुणवंत रावराणे, महेश गुरव, संजय पाटील, उज्वल नारकर, प्रकाश सावंत, महेश कदम, एस. एम. बोबडे, जयसिंग रावराणे, उदय कदम व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top