सावंतवाडी : प्रा. सचिन पाटकर यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय शिवसह्याद्री कला साहित्य संमेलन कराड - सातारा, वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह शिवाजी हाउसिंग सोसायटी कराड येथे रविवार ११ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था, सातारा समृद्धी प्रकाशन व सावली फाउंडेशन, महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिवसह्याद्री कला साहित्य संमेलन कराड - सातारा २०२४ या संमेलनामध्ये "राष्ट्रीय शिव सह्याद्री "यांच्यामार्फत दिला जाणारा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारलेले श्री. अजय तपकिरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रा. सचिन पाटकर यांना प्रदान करण्यात आला.
समाजातील निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाज हितासाठी विविध स्तरावर प्रगतशील क्रिया प्रक्रिया करणाऱ्या महनीय व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. इतरांनाही ते दीपस्तंभ सारखे मार्गदर्शन करून प्रगतशील समाज बनविण्याचे कार्य घडणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

