Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन प्रगती साधावी;सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल

आचिर्णे येथील कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैभववाडी: कोकणची भूमी ही नवरत्नांची खाण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता आहे. शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे. शालेय जीवनापासून ध्येय निश्चित केले पाहिजे. आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देत परिश्रम घेतल्यास यश निश्चित आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी केले.
आचिर्णे येथे ग्राम बहुउद्देशीय संस्था मुंबई संचलित, आचिर्णे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत व नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
कुमारी श्रेया संदीप शेळके या विद्यार्थिनी दहावी परीक्षेत वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ती सध्या येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसेच या महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. सिद्धेश्वर शंकर वाघमोडे यांनी कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या दोन विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना उपस्थितानी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभानंद राणे, शिवाजी कडू यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमानंद राणे, सचिव शिवाजी कडू, सुरेंद्र उर्फ भाई रावराणे, स्थानिक कमिटी सदस्य उत्तम सुतार, मोहन रावराणे, प्राचार्य श्री. प्रसाद फोंडके, पोलीस हवालदार श्री. धडे, पोलीस कॉन्स्टेबल सौ. चव्हाण व ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया गोसावी यांनी तर आभार उत्तम सुतार यांनी मानले.

ruchira top