Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध:पालकमंत्री नितेश राणे

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध:पालकमंत्री नितेश राणे

श्री कुणकेश्वर मंदिर येथे विधिवत दर्शन घेऊन पूजा

जास्तीत जास्त विकासनिधी उपलब्ध करून देणार

सिंधुदुर्ग : कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

आज त्यांनी प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिर येथे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. दर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, “कुणकेश्वर हा केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. या भागाच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, यात्राकाळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते, असे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या 'प्लास्टिक मुक्त यात्रा' या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top