Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

उन्मत्त होऊ नका ; स्वतःच्या पदाची काळजी घ्या!

आमदारांवर बोलण्याएवढी तुमची कुवत नाही…

शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांचे धोंडी चिंदरकर यांना बोचऱ्या शैलीत प्रत्युत्तर

मालवण : आमदारांवर बोलण्याएवढी तुमची कुवत नाही. आम. वैभव नाईक हे सुसंस्कृत चारित्र्यवान आमदार आहेत, त्यांची नाळ तळागाळातल्या जनतेची जोडलेली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःच्या पदाची काळजी घ्या, उन्मत होऊ नका, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रवक्ते मंदार केणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर केली आहे.

जनतेला मूलभूत सोयी सुविधा, ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित प्रश्न, विकास कामे, बंधारे, वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक गेली दहा वर्ष सातत्याने प्रयत्नशील आहेत.

मालवण तालुक्यामध्ये आजही अनेक मोबाईल टॉवर हे बंद आहेत, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाची देखील बिकट परिस्थिती आहे, पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्तेही अपूर्ण आहेत, रेशन दुकानावर ऑनलाईन धान्यामुळे लोकांची परवड होत आहे, गॅस सिलेंडर साठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावं लागतंय, विकासकामे निकृष्ट दर्जाची होत आहेत, पण तुमचे अधिकारी मात्र या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मोठमोठ्या उद्घाटनासाठी भरमसाठ खर्च करत आहेत, अशी टीका मंदार केणी यांनी यावेळी केली.

भ्रष्टाचार वाढत चालला आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यावर पालकमंत्र्यांचा वचक नाही त्यामुळेच सामान्य जनतेला महसुली कामांकरीता घिरट्या मारायला लागतायत, जनता असाही आरोप करते की प्रशासकीय अधिकारी वाळूचे हफ्ते खाण्यात मग्न आहेत. तालुक्यातील विकासकामे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले. अंमली पदार्थांचा फास तरुण पिढीला गिळंकृत करतोय. अवैध धंद्याचा अड्डा काही ठिकाणे बनलीत, त्यामुळेच मालवण तालुका हा व्हेंटिलेटर वर आहे, असे देखील प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हंटले आहे.

चिंदरकर तुम्ही आणि तुमचे नेते आर्थिक गोष्टीचे वाटप कसे करायचे याचा प्लॅन करू शकता, त्याशिवाय प्रचार, विकासकाम हा तुमचा निवडणुकीचा अजेंडा नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पदाची काळजी घ्या, एवढे उन्मत्त होऊ नका. जनता प्रत्येकाला संधी देते, आम. वैभव नाईक यांना नक्कीच पालकमंत्री होण्याची संधी जनता देईल, असे केणी म्हणाले.

ruchira top