सर्पमित्र अनिल गावडे यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात
नेरूर : विजय बटवलकर नेरूर वाघोसेवाडी यांच्या घरी नाग जातीचा साप आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.त्यानंतर फोनवरून माहिती मिळतात,सायंकाळी तीनच्या दरम्यान सर्पमित्र अनिल गावडे नेरूळ वाघोसेवाडी येथील विजय बटवलकर च्या घराकडे पोचून तात्काळ घरामध्ये असलेल्या नाग जातीच्या सापाचा बचाव केला आणि सापाला रेस्क्यू केले.
यावेळी त्यांचे सहकारी श्रीहरी बतलवार आणि तुषार आजगावकर यांनी सहकार्य केले. सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान देण्यात आले. सर्पमित्र अनिल गावडे यांचे विजय बटवलकर आणि त्यांच्या परिवाराने आभार व्यक्त केले.

