मसुरे केंद्र शाळेचा 'एक कविता पावसावरची' हा अनोखा उपक्रम
मसुरे | प्रतिनिधी : श्री दाजी साहेब प्रभूगावकर मसुरे नं.१ केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे पावसाळी कविता सादरीकरण आणि गायनाचा कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात नुकताच पार पडला. केंद्र शाळेच्या या सर्व विद्यार्थ्यांनी मसुरे गावामध्ये कवितांचा अनोखा पाऊस पाडला.या कवितांच्या पावसामध्ये मसुरे गाव ओला चिंब भिजून गेला.
जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे ही प्रशाला दरवर्षी आपल्या प्रशालेच्या वतीने विविध अनोखे उपक्रम विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्य जोपासण्यासाठी करत असते, असाच एक अनोखा उपक्रम करण्यात आला, विद्यार्थ्यांना निसर्गाची ओळख व्हावी आणि स्वरचित कविता निर्माण करता याव्यात, यासाठी निसर्गाच्या सानिध्यात 'एक कविता पावसावरची' हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन साजरा करण्यात आला.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उदंड प्रतिसाद लाभला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता बहारदार पद्धतीने सादरीकरण करून सर्वांचे कौतुक मिळवले.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यात निधी दीपक पेडणेकर,काव्या फरांदे, समर्थ शिंगरे, मिहीर मसुरकर , स्वानंदी हिंदळेकर, अरुंधती चव्हाण, क्रीशा दुखंडे, लतिबा सय्यद, भार्गव ठाकूर, आयन् शेख, मानसी पेडणेकर, जान्हवी सावंत, आर्या गावकर,जोबीया सय्यद, श्रेया वंजारे, कृपा पाटील, वैष्णवी तोंडवळकर,मुस्कान खान, कोमल मोंडकर, मानवी शिंगरे, अंकिता मोरे, मानसी मुळये आदी मुलांनी एकापेक्षा एक बहारदार कविता आणि गीत गायन उत्तमरित्या सादर केले.यावेळी माजी विद्यार्थीनी नेहा शिंगरे,मोक्षदा कातवणकर,रेश्मा गांवकर,यशस्वी कातवणकर,रिया भोगले आणि शिक्षक श्री.विनोद सातार्डेकर यांनीही कविता सादरीकरण केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख , शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शितल मसुरकर, उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, माजी अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर,श्री.गोपाळ गावडे सर,श्री.विनोद सातार्डेकर सर, सौ.रामेश्वरी मगर मँडम ,सौ.सुजाता वेडेकर मँडम,सौ.हेमलता दुखंडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन कु.मानसी पेडणेकर व कु.सान्वी हिंदळेकर यांनी केले. तर आभार यश बागवे याने मानले. या सादरीकरणाला संगीत साथ हार्मोनियम श्री गोपाळ गावडे सर, ढोलकीसाथ विनोद सातार्डेकर सर यांनी दिली. सर्व मान्यवरांचे स्वागत केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत यांनी केले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मसुरे केंद्र शाळेच्या या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

