भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आ. वैभव नाईक यांना सुनावले
मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारवर आयोजनावर टीका करणाऱ्या आ. वैभव नाईक यांना भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी चांगलेच सुनावले आहे.
आ. वैभव नाईक तूम्ही १० वर्षात एक आमसभा घेऊ शकला नाहीत आणि तुम्ही जनता दरबारावर टीका करता? तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? बरं झालं तुम्हीच समस्यांची यादी वाचली लोकांनातरी कळलं की तुम्ही १० वर्षात आमदार म्हणुन किती अपयशी आहात. सत्तेतल्या अडिज वर्षात न पुर्ण करु शकलेला एसटी डेपो सोडला तर तुमच्या कल्पकतेतल १ काम सांगा जी जनता लक्षात ठेवील.
"जनतेचा निर्धार पक्का आता आ. वैभव नाईक यांना धक्का." तेव्हा कितीही बोंबा आता मारा पालकमंत्री रविंद्र चव्हणाच तुम्हाला घरी बसवणार. फुल प्रूफ प्लॅन तयार आहे. आम्ही वाट बघतोय निवडणुकीची, किमान पन्नास हजारच्या फरकाने माननीय निलेश राणेना आम्ही विजयी करणारच. असा ठाम विश्वास भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.

