स्काय न्यूज टुडे / आचरा : वनभोजन म्हटल की रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीसा विरंगुळा मिळण्यासाठी केलेली सहभोजनाची व्यवस्था. आचरा येथील श्री बाळगोपाळ मंडळाचे वनभोजन याला अपवाद नाही. मंडळातील अबालवृद्ध तसेच महिला वर्ग वनभोजनात दंगुन गेले. जेवण बनविण्यापासून ते प्रत्येक जण आपापल्या दुनियेत हरपून गेला होता.
आचरा वरचीवाडी येथील श्री बाळगोपाळ मंडळ हे आचरा पंचक्रोशीत नावाजलेले मंडळ आहे. दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. आरती, भजन, दिंडी भजन, गरबा, गोमू नाच यासारख्या अनेक उपक्रम हे मंडळ अगदी मनापासून करत असते सर्वजण एकोप्याने आणि एकदिलाने योगदान देतात. यावर्षी मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी वनभोजनाचे नियोजन केले. चिंदर पडेकाप धबधबा येथे वर्षा पर्यटनानिमित्त जेवणाचा आस्वाद घेतला.

