Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

बेपत्ता युवकाचा मृतदेह नदीपात्रातील खडकांची कोंड येथे सापडला

गावावर शोककळा…

रामगड : गळाने मासे पकडण्यासाठी गेलेलल्या रामगड कुंभारवाडी येथील राहूल कृष्णा जिकमडे या युवकाचा मृतदेह आज तिस-या दिवशी सकाळी शोधमोहिमे दरम्यान घटनास्थळा पासून सुमारे पाचशे मिटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत दिसून आला.

मिळालेल्या माहितीनुसार
राहूलला गळाने मासे पकडण्याचा छंद होता. मात्र तो स्वतः मासे खात नव्हता. अतिशय हुशार म्हणून राहूल ओळखला जात होता. बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट साठी कणकवली येथे त्याने प्रवेश घेतला होता. सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपल्याने त्याच्या आईने कष्टाने त्यांना सांभाळले होते, शिकवले होते.

उशिरापर्यंत तो मासेमारीसाठी थांबत असल्याने गुरुवारी सायंकाळी तो आला नाही म्हणून राहूलच्या आईने आणि बहिणीने त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. ग्रामस्थही शोध मोहिमेत सहभागी होते.

याबाबत आचरा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ग्रामस्थ, पोलीस, महसूल, स्थानिक प्रशासन तसेच आपत्ती यंत्रणा, एनडीआरएफ, टीम जय बालाजी सर्च अँड रेस्क्यू टीम मालवण सदस्य वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, समीर गोवेकर, प्रसाद मयेकर, छगन सावजी, भूषण जुवाटकर आदी स्कुबा डायव्हर या मोहिमेत सहभागी झाले.

तिस-या दिवशी शनिवारी सकाळी रामगड सरपंच शुभम मठकर पो.पा नारायण जिकमडे, सुरेंद्र जिकमडे, अविनाश सादये, विष्णू कोळबकर, सुमेश सादये महेश पारकर, बंटी जाधव यांसह अन्य ग्रामस्थांनी जेथे राहूल मासे पकडण्यासाठी गेला होता त्या भागात शोध मोहीम सुरू केली. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळा पासून अंदाजे पाचशे मिटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांना राहूल जिकमडे याचा मृतदेह आढळून आला.

राहूलच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण रामगड गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

ruchira top