भाऊ भोगले /मालवण : भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबई संचलित प्राथमिक शाळा, मालवण या प्रशालेत दिनांक 4 फेब्रुवारी2026 रोजी 'बाल आनंद मेळावा व आठवडी बाजार ' हा अभिनव उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, गणिती कौशल्ये आणि आत्मविश्वासाची वृद्धी व्हावी, या उद्देशाने प्रशालेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा प्रतिवर्षी 'शालेय आठवडी बाजार' हा अभिनव उपक्रम घेण्यात येतो. या वर्षीही या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी 'व्यापाऱ्याची' भूमिका साकारून प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला.

शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे स्टॉल्स लावून एका छोट्या बाजारपेठेचे स्वरूप देण्यात आले होते. या बाजारामध्ये प्रामुख्याने ताजी फळे व भाज्या, हंगामी फळे.घरगुती खाद्यपदार्थ: लाडू, चिवडा, भेळ, ज्यूस, शालेय वस्तू: उकडीचे मोदक, सुकी मासळी या सारखे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री. हणमंत तिवले सर, पर्यवेक्षक मा.श्री. बनसोडे सर, लोकल कमिटी सदस्य मा . श्री विठ्ठल साळगांवकर, पत्रकार श्री भूषण मेथर, श्री केशव भोगले सर, श्री. देसाई सर, श्री.किशोर मळेकर सर सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आपल्या दुकानांची मांडणी केवळ विक्रीच नव्हे, तर पैशांचा हिशोब ठेवणे आणि ग्राहकांशी सौजन्याने बोलणे याचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.या बाजारात शाळेतील शिक्षकांसह पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी केली. "पुस्तकी ज्ञानासोबतच मुलांना अशा व्यावहारिक अनुभवाची गरज आहे," अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.

