Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पंधरा दिवसात अनुदान न मिळाल्यास मोर्चा काढणार!

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा

घरकुलच्या लाभार्थ्यांची व्यथा वेदनादायी…

मालवण : सर्वसामान्य ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या व्यथा वेदनादाई आहेत. शासनाने प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना या मोठमोठ्या योजनांच्या नावाखाली लोकांना घरे बांधण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले, मात्र काही ठिकाणी अर्धवट तर काही ठिकाणी एकही हप्ता न मिळाल्याने असलेली झोपडी, जीर्ण घर तोडून नविन घर बांधण्यासाठी घेतलेले सर्वसामान्य लाभार्थी अडचणीत आलेले आहेत.

मनरेगा योजनेची ही हीच स्थिती आहे. येत्या पंधरा दिवसात शासनाने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तसेच मनरेगा लाभार्थी यांचे अनुदान न दिल्यास पंचायत समितीवर लाभार्थ्यांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे.

मालवण येथील तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खोबरेकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्ते प्रमुख मंदार केणी, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, बंड्या सरमळकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, मसुरे विभाग प्रमुख तथा मर्ढे उपसरपंच राजेश गांवकर, सिद्धेश मांजरेकर, अक्षय रेवंडकर, प्रसाद चव्हाण, सोनाली डिचोलकर, उपशहरप्रमुख मोहन मराळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य शासन सध्या योजना जाहीर करत आहेत, मात्र सर्वसामान्यांना निधी उपलब्ध करून देण्यास हात आखुडता घेतला जात आहे. घरकुल योजनेसाठी सर्वसामान्यांनी मोठ्या आशेने घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी आपली मातीची घरे, झोपड्या हटविले आणि घर बांधण्यासाठी एप्रिल महिन्यात सुरूवात केली, मात्र आज चार महिने होत आले तरी निधी उपलब्ध होत नसल्याने घरांची बांधकामे रखडली आहेत. काहींनी पहिला हप्ता मिळाला मात्र दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. पहिल्या हप्त्यामुळे घरे बांधण्यासाठी गेलेले, आज अडचणीत आले आहेत.राहण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात जावून राहण्याची वेळ आली आहे. शासनाने योजना केल्या आहेत, मात्र निधीच नसल्याने योजना पोळक ठरत आहेत, अशीही टिका यावेळी हरी खोबरेकर यांनी केली आहे.

मालवण तालुक्यात अनेक घरे आज अडकून पडली आहेत, लाभार्थी शासनाच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. शासनाच्या दरवाजात जाऊन परत येत आहेत, लाभार्थी आज हताशपणे शासनाच्या अनुदानाच्या आशेवर अवलंबून राहिले आहेत. तालुक्यातील लाभार्थ्यांनी अनुदान मिळाले नाहीत, त्यांनी आपली नावे शिवसेना तालुका कार्यालयात द्यावी. अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. शासनाने यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून न दिल्यास सर्व लाभार्थ्यांना घेवून पंचायत समितीवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात केलेल्या निष्ठायात्रेतून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या वेदना समोर आल्या आहेत. यात अनेकांची कामे शासनाकडून निधी रखडल्यामुळे अपूर्ण असल्याचे दिसून आले. तर काहींनी कामे केली असतानाही त्यांना निधी नसल्याने कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. राज्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोठा, सिंचन विहीर, बायोगॅस प्रकल्प, शेततळे, वृक्ष लागवड, कंपोस्ट खत, गांडूळ खत टाकी, कुक्कुटपालन शेड आदी कामे मंजूर करण्यात येतात. मालवण तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामगारांच्या मजुरीची तसेच सार्वजनिक आणि वैयक्तिक कामाच्या साहित्यासाठीची एकूण १ कोटी रुपये रक्कम सरकारने थकीत ठेवली आहे. लाभार्थ्यांनी कर्जे काढून, उसनवारी घेऊन या कामांसाठी खर्च केला आहे. मात्र, कामे पूर्ण झाली, तरी शासनाकडून मंजूर कामांसाठी निधी देण्यात आलेला नाही, अशाप्रकारच्या वेदना निष्ठायात्रेतून आमच्यासमोर आल्याचेही यावेळी हरी खोबरेकर म्हणाले.

ruchira top