दिपीका देऊलकर | मालवण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्यामार्फत, जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या, प्राथमिक शिक्षण पदविका (डी. एल. एड् ) अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहिर झाला. येथील सुनितादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजची, कु. वैष्णवी अनिल पाटकर हीने, ८५.४५ टक्के गुण मिळवून, प्रथम क्रमांक प्राप्त केला,तर प्रथम वर्ष परीक्षेत कु. सायली उदय गोसावी, हिने ८९.४० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड्) चा दोन्ही वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला.द्वितीय वर्षाचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक- कु.वैष्णवी अनिल पाटकर (८५.४५ टक्के) , द्वितीय क्रमांक - कु.चिन्मय पुंडलिक ढोके ( ८३.९०) तृतीय क्रमांक - कु. नेहा जयवंत खोर्जे (८३.८५), प्रथम वर्षाचा निकाल - प्रथम क्रमांक- सायली उदय गोसावी (८९.४०) द्वितीय क्रमांक - तन्वी प्रदीप गावडे (८७.४०), तृतीय क्रमांक- कु.अक्षता किशोर कुबल (८५.९०%) असा असून दोन्ही वर्षाचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना प्राचार्य हेमंत प्रभु , प्रा.दत्तात्रय माळी, नागेश कदम, प्रा. सौ. पूर्वा शिरसाट, प्रा. रमेश वळवी , प्रा.सौ. आनंदी घोगळे,या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
तरी यशस्वी विद्यार्थ्यांचे, कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य हेमंत प्रभू, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शालेय समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

