डॉ. सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळ यांचे आयोजन
अलिबाग रायगड : डॉ. सचिन शरद राऊळ व श्री. राकेश अनंत राणे मित्र मंडळ आयोजित भव्य खेळी नारळ फोडणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी 1: 30 वाजता या स्पर्धा होणार असून नागांव, अलिबाग येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या पंधरा दिवस आधी ही स्पर्धा भरवण्यात येते. यावर्षी सुद्धा ही स्पर्धा याचं धर्तीवर होणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १,००० असून विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक ३३,००० रुपये, द्वितीय क्रमांक १५,००० रुपये, तृतीय क्रमांक ५,००० रुपये , चतुर्थ क्रमांक ५,००० रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी स्पर्धकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. स्पर्धेचे नियम 👇
1) प्रत्येक संघात पाणी असणारे पाच नारळ असतील.
(2) स्पर्धा हातावर खेळली जाईल.
(3) नियम व अटी मंडळाचे असतील.
(4) प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य त्यानंतर अधिक नोंदणी झाल्यास 48 संघ खेळवले जातील.
(5) एक मारेकरी दोन संघातून खेळू शकतो.
(6) चिट्टी प्रमाणे तसेच प्लॉटमध्ये खेळवले जातील.
(7) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
दरवर्षी कोकण, गोवा, ठाणे या ठिकाणाहून अनेक स्पर्धक सहभागी होतात, तरी दरवर्षीप्रमाणे रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, ठाणे, गोवा या ठिकाणच्या स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सचिन राऊळ व श्री राकेश राणे मित्र मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी विपुल राऊळ :7798642214आणि शैलेश नाईक :9850231595 यांच्याशी संपर्क साधावा.

