Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पोलिस उपनिरीक्षक पदी महेश देसाई यांना बढती…

खाकी वर्दीतील देवमाणूस अशी ओळख..

आचरा : आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई यांची खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक या पदावर बढती झाली आहे. त्यांची पदोन्नती पर बदली कोकण परिक्षेत्र येथे झाली आहे. तेथून त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

आचरा पोलिस ठाण्याच्या वतीने देसाई यांचा सत्कार करण्यात आला. मागील पाच वर्षे देसाई हे आचरा पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

महेश देसाई हे १९९१ साली पोलिस दलात भरती झाले. कुडाळ, देवगड, सावंतवाडी उपविभागीय कार्यालय, मालवण, वाचक शाखा आणि आचरा या पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा दिली.

आचरा पोलिस ठाण्यात सेवा बजावत असताना हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदांवर त्यांनी समाधानकारक काम केले.

आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते त्यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पोवार यांनी मनोगत व्यक्त करताना देसाई यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. कायदा व प्रशासनाची माहिती असणारे, ३३ वर्षाच्या पोलिस खात्यातील अनुभवाचा पोलिस अंमलदाराना फायदा व्हायचा. सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ नेहमीच जोडलेली दिसून यायची. पोलिस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक हा ३३ वर्षांचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता, अशा भावना पोलिस अंमलदार यांनी व्यक्त करताना पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सेवेसाठी देसाई यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, तुकाराम पडवळ, हवालदार मिलिंद परब, ज्योती परब, स्वप्नाली तांबे, मनोज पुजारे, स्वाती आचरेकर, विशाल वैजल, यांच्यासह अन्य पोलीस अंमलदार उपस्थित होते.

कोरोना महामारी काळात देसाई यांनी खाकीला गर्व वाटावा असे काम केले. यांसह देवगड पोलिस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यासाठी त्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. आठवड्यापूर्वी त्रिंबक गावात एका सर्वसामान्य ग्रामस्थाचे घर कोसळून नुकसान झाल्याचे समजताच देसाई यांनी तत्काळ आर्थिक मदतीचा हात दिला होता. त्यांच्या या खाकी वर्दीतल्या देवमाणसाची प्रचिती आचरावासियानी अनेकदा घेतली आहे.

ruchira top