जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड
संतोष हिवाळेकर | पोईप : मालवण तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच पोईप येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोईप, विरण मधील 17 व 19 वयोगटातील मुलांनी विजय प्राप्त करत जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
या स्पर्धा 2 दिवस पोईप हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाल्या. यामध्ये मालवण तालुक्यातील 14, 17, 19 वयोगटातील मुली आणि मुलगे असे 54 संघांनी सहभाग घेतला होता. तसेच 17 वयोगटातील मुलगे व 19 वयोगटातील मुली यांनी विजय प्राप्त करत, जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. या दोन्ही विजयी संघाना पोईप हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संतोष तावडे व प्रसाद चव्हाण यांनी या मुलांना मार्गदर्शन केले.
या दोन्ही विजयी संघाना पोईप सर्कल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर,उपाध्यक्ष गोपीनाथ पालव तसेच सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक कुंभार सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पोईप हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या हॉलीबाॅल स्पर्धेसाठी मालवण तालुका क्रीडा समन्वयक अजय शिंदे, घेवडे सर , पंकज राणे,शाम वांरग, महेंद्र वारंग आदी शिक्षक उपस्थित होते.

