Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक उपचार केंद्रचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

जुबेर खान | मालवण : रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर वतीने डॉ. विवेक रेडकर यांनी ज्येष्ठांसाठी सुरू केलेले वैद्यकीय सुश्रुषा, उपचार, पुनर्वसन व संशोधन केंद्र जेष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात महत्वपूर्ण दुवा ठरेल. असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा शासनाकडून दिल्या जात असताना त्यात वाढ करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नाशील राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर फॅटर्निटी क्लबच्या सूचनेनुसार आवश्यक त्या अधिक सुधारणा करण्यासाठी शासन निश्चितच प्रयत्नाशील राहील. असेही पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

मालवण येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुश्रुषा, उपचार, पुनर्वसन, संशोधन केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ डॉक्टर तथा जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, दीपक पाटकर, डॉ. सिमाली रेडकर, डॉ. सुप्रिया रेडकर, रविकिरण तोरसकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. अजित लिमये, डॉ. अच्युत सोमवंशी, डॉ. सुहास बिले, डॉ. हरिष परुळेकर, डॉ. राहुल पंतवालावलकर, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. रामचंद्र चव्हाण, डॉ. अविनाश झाट्ये, डॉ. शिल्पा झाट्ये, डॉ. अमोल झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. अनिरूद्ध मेहेंदळे, डॉ. अश्विन दिघे, डॉ. राहुल वझे, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. गार्गी ओरसकर, दशरथ कवटकर, पल्लवी खानोलकर डॉ. पाताडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, सन २०११ साली रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर या संस्थेने नेरुर-कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आजोळ ही वृद्धापकाळात त्यांची वैद्यकीय काळजी घेणारा उपक्रम सुरू केला. सिंधुदुर्गात वृद्धांचे वास्तव्य जास्त असून त्यांचा मृत्यू दरही इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. असे सांगताना रेडी येथे ट्रस्ट स्थापन सुरू करून त्यांच्यासाठी ट्रस्ट हॉस्पिटल संस्थेने सुरू केले आहे. ज्यामध्ये दिलासा आणि विसावा असे दोन पूर्णपणे समर्पित ज्येष्ठ नागरिक उपचार कक्ष कार्यरत आहेत. सध्या जिल्हयात वृद्धाश्रम आहेत. पण ज्येष्ठांवर उपचार करणारी स्पेशल आरोग्य व्यवस्था नाही.

मात्र संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये नूतन वास्तूमध्ये डॉ. रेडकर कुटुंबिय जिल्हयातील पहिले अत्याधुनिक सिनियर सिटीझन सेंटर (ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र) सुरू होत असल्याचे सांगितले. जेष्ठ नागरिक उपचार केंद्र सिंधुदुर्ग जिल्हातील रोल मॉडल ठरावे. हा हेल्थ पॅटर्न राज्यात आदर्श ठरवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया ला साथ देताना टेलीमेडिसिन उपचार यालाही प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांनी डॉ. रेडकर यांच्या उपक्रमास शुभेच्छादेताना सांगितले, डॉ. रेडकर नेहमीच आरोग्यविषयक नवीन संकल्पना घेऊन येतात आणि त्या यशस्वी करतात. असे सांगत मौलिक मार्गदर्शन केले.

आवश्यक ते सहकार्य करणार

डॉ. रेडकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुरू केलेल्या उपक्रमांना आवश्यक असणारे सर्वच सहकार्य आपण करणार आहोत. ज्येष्ठांचे जीवन सुहाहय होण्यासाठी शासन आपल्या परिने प्रयत्न करत आहेत, मात्र एखादी सेवाभावी व्यक्ती अगर संस्था पुढे येऊन उपक्रम राबवित असेल तर आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊन पाठिशी राहू सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी आपल्या परिसरातील ज्येष्ठांना आवश्यक असणाऱ्या औषधांचा डाटा तयार केल्यास ती औषध शासनाकडून, जेनरिक मेडिसिन स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, औषध किंमती जास्त म्हूणन जिल्ह्यात कुठलाही रुग्ण औषध पासून वंचित रहाणार नाही. शासन सर्वातोपरी सहकार्य करणार. असेही पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

तात्काळ जागा उपलब्ध

डॉ. रेडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर फॅटर्निटी क्लबसाठी सिंधुदुर्गनगरी येथे वास्तू उभारणीसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा जिल्हयातील डॉक्टरांना आणि त्याचबरोबर नागरिकांनाही होवू शकणार आहे, असे सांगितले. क्लब व डॉ. रेडकर यांच्या मागणीनंतर जिल्हा डॉक्टर फॅटर्निटी क्लबतर्फे एक निवेदनही पालकमंत्र्यांना देण्यात आले. पालकमंत्री यांनी आपल्या भाषणात डॉक्टरांच्या मागणीनुसार आवश्यक असणारी जागा तात्काळ ताब्यात देण्याचे निर्देश दिले. यावेळी डॉक्टर संघटनेने पालकमंत्र्यांचे आभार मानले.

मी भाग्यवान….

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले मी भाग्यवान आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षे रुग्णसेवा देणाऱ्या डॉ. दिघे यांच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली. असे सांगत पालकमंत्री यांनी डॉ. दिघे यांच्या कार्यासमोर नतमस्तक व्हावे अश्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.

ruchira top