Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रेल्वेस्थानक सुशोभिकरण उद्या लोकार्पण सोहळा

कणकवली, सिंधुदुर्गनगरी आणि सावंतवाडी येथे कार्यक्रम

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र वाटप होणार

सिंधुदुर्ग : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रेाजी होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान सभा सदस्य नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शरद राजभोज, अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड आदी उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता कणकवली रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप , दुपारी १२:०० वाजता सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप , दुपारी ०३:०० वाजता सावंतवाडी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाचा लोकार्पण कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती पत्र देखील वाटप करण्यात येणार आहेत.

        

ruchira top