एसटी-दुचाकी यांच्यात अपघात
कुडाळ | प्रतिनिधी : सरंबळ तळेकरवाडी येथे एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघातात होऊन आयटी इंजिनियर शुभम विठ्ठल परब (वय वर्ष 25) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
गरीब परिस्थितीशी झुंज देत असताना एकुलता एक मुलाच्या मृत्यूने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वभावाने नेहमी हसतमुख असणाऱ्या शुभमच्या मृत्यूने सरंबळ गाव परिसरात शोककळा पसरली आहे.
कुडाळ सरंबळ ही सकाळी 10:30 वाजताची दैनंदिन एसटी फेरी आहे. कुडाळ येथून सरंबळकडे गाडी जात होती या दरम्यान शुभम हा सरंबळ हुन कुडाळकडे निघाला होता.
सरंबळ तळेकरवाडी येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यात शुभम गंभीर जखमी झाला तर शुभम यांच्यासोबत सरंबळ येथील रमेश जानकर वय 50 हे ही गंभीर जखमी झाले. शुभम याला तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान शुभम परब यांचा मृत्यू झाला. तर जखमी रमेश जानकर यांच्या हात, पाय, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सरळ सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली.
अपघातातील मयत शुभम परब यांच्या घरची परिस्थिती गरीबीची आहे. प्रतिकूल स्थितीत त्यांनी इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण केले. अगदी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये टॉपर असणारा शुभमने शालेय शिक्षणापासून इंजिनीयर होत पर्यंत प्रत्येक ठिकाणी टॉपर म्हणून ओळख होती. शुभम अभ्यासाबरोबर कला क्षेत्रात देखील हुशार होता. चित्रकला क्षेत्रात शुभम याचा नावलौकिक होता.शुभम परब याच्या पश्चात आई-वडील बहिण असा परिवार आहे.

