कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूळ येथे आमदार वैभव नाईक यांची निष्ठा यात्रा उत्साहात संपन्न झाली. सरपंच भक्ती घाडी आणि कार्यकर्त्यांनी या निष्ठा यात्रेचे स्वागत केले.
निष्ठा यात्रेस उत्स्फूर्त उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख संजय पडते तसेच आमदार वैभव नाईक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन बोभाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सरपंच भक्ती घाडी, विभाग प्रमुख शेखर गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, मंजुनाथ फडके तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

