कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने आयोजन
कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने 'माझा लोकराजा' महोत्सवाचे दिनांक 20 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिर येथे हा महोत्सव साजरा होणार असून यंदा या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे.
सायंकाळी चार वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त कोकणची लोककला दशावतार टिकून ठेवणाऱ्या कै. शंकर मौर्य कुटुंबीय, कै. बाळू मुणनकर कुटुंबीय,सदाशिव धुरी, दिलीप मेस्त्री , राम कोरगावकर या ज्येष्ठ दशावतार कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच काही निवडक दशावतार कलाकारांसोबत संयुक्त दशावतार 'याज्ञिक पुत्र भुरीश्रवा' हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यावर्षीच्या महोत्सवातील संयुक्त नाटकातील भूमिका आणि कलाकार पुढील प्रमाणे आहेत.
गणपती - प्रतीक कलिंगण
रिद्धी सिद्धी -दिनेश मांजरेकर
राजा भूरिश्रवा -मोरेश्वर सावंत
सात्यकी - आनंद कोरगावकर
शंकर -सदाशिव मोडक
नारद -योगेश कोंडुरकर
गंगा - यश जळवी
राणी - संतोष सामंत
मुली - दीप निर्गुण
अर्जुन -संजय वालावलकर
राजा सोमदत्त- संजय पाटील
राजा शिनी - यशवंत तेंडोलकर
कृष्ण - उदय मोर्ये
राक्षस - अमित परब

यासोबतच हार्मोनियम- आशिष तवटे, अमोल आकेरकर, मृदुंगमणी - निखिल निकम, संजय नाईक , झांज- विनायक सावंत आणि हरेश नेमळेकर यांची संगीतसाथ असणार आहे. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुळ, सिद्धेश कलिंगन लाजरी क्रिकेट ग्रुप ,कुडाळ, अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, दिपक भोगटे, स्वरूप सावंत यांचे विशेष सहाय्य लावणार आहे. तरी सर्वांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

