माजी सभापती महेंद्र चव्हाण, सरपंच रघुनाथ धुरी यांनी ग्रामस्थांच्या वतीने मानले आभार
जुबेर खान | मालवण : मुसळधार पावसात साकव कोसळून वाहून गेल्याची घटना हिवाळे बौद्धवाडी-धुरीवाडी येथे घडली होती. साकव दुरुस्ती उभारणीसाठी जिल्हा नियोजन मधून 10 लाख निधी मंजूर झाला आहे.
हिवाळे गावातील बौद्धवाडी-धुरीवाडी जोडणरा साकाव काही भाग मागील महिन्यात मुसळधार पावसात कोसळून वाहून गेला. भाजपा नेते निलेश राणे यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. आवश्यक निधीची उपलब्धता करून लवकरात लवकर साकव उभारणी बाबत कार्यवाही केली जाईल असा शब्द येथील ग्रामस्थ यांना दिला होता. त्यानुसार निलेश राणे यांनी पाठपुरावा करून खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून 10 लाख निधी उपलब्ध करून साकव उभारणी काम तातडीने मंजूर करून घेतले आहे. अशी माहिती माजी सभापती महेंद्र चव्हाण, सरपंच रघुनाथ धुरी यांनी दिली आहे.
दरम्यान, खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे हिवाळे ग्रामस्थ यांसह सरपंच रघुनाथ धुरी, माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी आभार मानले आहेत.

