मालवण | प्रतिनिधी : भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २००६- ०७ दहावी बॅच आणि २००८- ०९ बारावी बॅच या दोन्ही बॅचतर्फे भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या बालवाडी विभागाला स्मार्ट टीव्ही तर भंडारी ए. सो. हायस्कुलला म्युझिक एम्प्लिफायर प्रदान करण्याचा सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम भंडारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी सर यांच्या पुढाकारातून झाला. यावेळी संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर, भंडारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी सर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सौ. राधा दिघे, पत्रकार आणि माजी विद्यार्थी भूषण मेतर आदी उपस्थित होते.

प्रारंभी मानसी परुळेकर मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक भूपेश गोसावी यांनी केले. यावेळी मान्यवरांनी विचार मांडत माजी विद्यार्थी हे भंडारी हायस्कुलची ताकद असून माजी विद्यार्थी यांच्यामुळे संस्थेच्या अनेक गरजा पूर्ण होत आहेत, विद्यार्थ्यांनी शाळेला कधी विसरू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रफुल्ल देसाई यांनी तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे भूषण मेतर यांनी विचार मांडले. आभार भूपेश गोसावी यांनी मानले.
यावेळी या दोन्ही बॅचचे माजी विद्यार्थी हेमंत शिरगांवकर, भूषण पिसे, नितेश जाधव, केशव साठे, विशाल हेदळकर, दिगंबर कोळंबकर, भालचंद्र आपकर यासह शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

