रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचा उपक्रम ; पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्या लोकार्पण
जुबेर खान | मालवण : रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुश्रुषा, उपचार, पुनर्वसन, संशोधन (सिनियर सिटिझन मेडिकल ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशन, रिसर्च) केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ८ ऑगस्ट रोजी, दु. ३ वाजता, मालवण येथील संस्थेच्या नूतन वास्तू मध्ये होणार आहे.
सन २०११ साली रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर या संस्थेने कुडाळ, नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी 'आजोळ' हा वृद्धापकाळात त्यांची वैद्यकीय काळजी सेवा देणारा उपक्रम सुरू केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्धांचे वास्तव्य जास्त असून यांचा मृत्यू दरही इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. अंथरुणाला खिळलेले रुग्ण ज्यांची काळजी पेशंटचे जे नातेवाईक घरी घेऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी देखील रेडी येथे हॉस्पिटल संस्थेने ट्रस्ट चालू केला आहे. ज्यामध्ये 'दिलासा' आणि 'विसावा'असे दोन पूर्णपणे ज्येष्ठ नागरिक समर्पित उपचार कक्ष कार्यरत आहेत.
सध्या जिल्ह्यात वृद्धाश्रम आहेत, पण ज्येष्ठांना उपचार देणारे कुठलेही जिर्याट्रिक मेडिकल सेंटर आपल्या जिल्ह्यात , रेडी हॉस्पिटल सोडल्यास नाही.
मालवण येथील संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये नूतन वास्तुमध्ये डॉक्टर रेडकर कुटुंबीय जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक जिर्याट्रिक सेंटर (ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र) सुरू करीत आहेत.
मालवण येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुभाष दिघे समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांच्या समस्या बाबत पालकमंत्री यांचे लक्ष वेधले जाणार आहेत, अशी माहिती रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.विवेक एकनाथ रेडकर , तसेच रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचे विश्वस्त रविकिरण चिंतामणी तोरसकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

