शिवसेनेना कुडाळ-मालवण निरीक्षक बाळा चिंदरकर, दिपक वेतकर यांनी व्यक्त केला विश्वास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेचा मिळत आहे मोठा पाठिंबा
मालवण | प्रतिनिधी : जनता महायुती सरकार सोबत असून लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेचा पाठिंबा वाढत आहे. पुन्हा एकदा महायुतीच सत्ता महाराष्ट्रात येणार आहे. अनेकजण महायुती सोबत येत असून लवकरच अनेक बडे चेहरे शिवसेना पक्षात (शिंदे गट) दाखल झालेले दिसून येतील. आगामी काळात मालवण कुडाळ मतदार संघात ही मोठे प्रवेश होणार आहेत. असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे कुडाळ- मालवण मतदार संघाचे निरीक्षक बाळा चिंदरकर व दिपक वेतकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत खा. नारायण राणे साहेब मोठया मताधिक्याने विजयी झाले. येथील जनतेने आपण महायुती सोबत असल्याचे दाखवून दिले. आगामी काळात हेच चित्र दिसून येईल. असे चिंदरकर, वेतकर म्हणाले.
शिवसेना नेते तथा निरीक्षक रविंद्र फाटक या मतदार संघात लक्ष ठेवून आहेत. जनतेचा प्रतिसाद पाहून शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवण तालुका आढावा बैठकीत बाळा चिंदरकर, दीपक वेतकर यांनी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
बैठकी नंतर मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी,
उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पाटकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, युवतीशहर प्रमुख प्रियांका मेस्त्री, प्रथमेश सावंत, युवातालुकाप्रमुख मिहिर राणे, क्रांती धुरी, दर्शना मालंडकर, गुड्डीन फर्नांडिस, गितांजली लाड, भक्ती कवटकर, गीता नाटेकर, सुरेखा आस्वलकर, कविता मोंडकर, आशा वळपी, निलम शिंदे, अश्विन हळदणकर, चंद्रकांत गोलतकर, अरूण तोडणकर, शिवम हिर्लेकर, कमलकांत पारकर, शुभम सावंत, भावेश सावंत तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईकर चाकरमान्यांचा गणेशोत्सव प्रवास मोफत होणार आहे. भाविक चाकरमानी यांना टू बाय टू बसने मोफत कोकणात आणण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार प्रत्येक गावात एसटी अगर लझरी बसेस सोडून चाकरमान्यांना मोफतपणे गणपती उत्सवासाठी कोकणात आणणार आहोत. कोकणी माणूस शिवसेनेचा श्वास आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्वोतोपरी सेवेत कार्यरत आहोत. कोकणातील प्रत्येक घरात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेतूनही तसेच अन्य योजनेतू चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बाळा चिंदरकर, दीपक वेतकर यांनी सांगितले.

