भाऊ भोगले /बागायत: प्रति वर्षप्रमाणे याही वर्षी दि. १२ नोव्हें.२०२५ ते १४ नोव्हें. २०२५ रोजी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असणारी माळगांव गावच्या आई सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सपन्न होत आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन माळगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.


कार्यकम :-
- सकाळी १०.०० वा. पेटारा आगमण
- सकाळी ११.०० वा. अभिषेक व पूजा.
- दुपारी १२.०० वा. पासून ओट्या भरण्यास सुरुवात
- रात्री ११. ०० वा. पालखी प्रदिक्षिणा.
- रात्रौ १२.३० वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दणदणीत नाट्य प्रयोग
- दि. १३ - ११ - २०२५ रोजी संध्या. ४.०० वा. पालखीचे बागायत मुक्कामी प्रस्तान
- संध्या. ६.०० वा. बागायत ब्राम्हणदेव मंदिर येथे पालखीचे आगमण
- रात्रौ . ७.३० वा. पावणाई देवी दिंडी भजन माळगांव यांचा लाईव्ह दिंडी भजनाचा कार्यक्रम
- दि. १४ - ११- २०२५ रोजी दु. १.०० वा. महाप्रसाद व भंडारा
- सायं. ५.०० वा. पालखी स्वगृही परतेल
संपूर्ण कार्यक्रमात खास आकर्षण नेत्रदीपक रांगोळी प्रदर्शनाचे .

