भाऊ भोगले | मालवण : नेरूरपार पुलावर धोकादायक स्वरूपाचे खड्डे तयार झाले आहेत. त्याचप्रमाणे पुलाच्या दोन्ही बाजूला जोडल्या रस्त्यामध्ये आणि पुलामध्ये अंतर तयार झाल्याने सर्व वाहन चालकांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे.
सदर रस्तापूल हा कुडाळ - मालवण अशा महत्वाच्या दोन तालुक्यांना जोडत आहे. नेहमीचीच मोठी वर्दळ असल्याने संबधित विभागाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

