Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

चक्रीवादळामुळे मासेमारी ठप्प ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक मच्छिमारांना आर्थिक सहाय्य मिळावे…!

चक्रीवादळामुळे मासेमारी ठप्प ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक मच्छिमारांना आर्थिक सहाय्य मिळावे…!

मत्स्यव्यवसाय विभागाचे वेधण्यात आले लक्ष

स्काय न्युज टुडे प्रतिनिधी | राहुल जाधव : कोकण किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय पुर्ण ठप्प झाली असून मत्स्य दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार मोठया संकटात सापडला आहे. संकटग्रस्त मच्छिमारांना मत्स्यदुष्काळी नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ) आर्थिक सहाय्य मिळावे. या मागणीचे निवेदन दांडी येथील रश्मी रोगे यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग कार्यालयास देण्यात आले आहे.

यावेळी सौ. अन्वेशा अजित आचरेकर, भाई जाधव, वसंत गांवकर, विकी रोगे, सागर जाधव, बाळा मिठकर यांसह अन्य उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेले १० दिवस आपल्या कोकण किनारप‌ट्टीवर जे चक्रीवादळ घोंगावत आहे यामुळे पूर्णतः मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. जिल्हातील पारंपारिक मच्छिमारांवर मत्स्यदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार मच्छिमारांना कृषी दर्जा प्राप्त झाला आहे. तरी ज्याप्रमाणे आमच्या शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्ती मुळे ओढवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत जसे अर्थसाहाय्य मिळते त्याच धर्तीवर पारंपारिक मच्छिमारांना सुद्धा आर्थिक सहाय्य मिळावे. अशी मागणी पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने आम्ही करीत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top