मुंबईतील कोकणवासियांसाठी खास गणेशोत्सव मोफत रेल्वे प्रवास_
भाजपा नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजन
सिंधुदुर्ग : सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मुंबईत राहणाऱ्या आणि आपल्या गावी कुडाळ मालवणला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवास भाजपा नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भाजपा एक्सप्रेस माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.
दादर कुडाळ नॉनस्टॉप भाजपा एक्सप्रेस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटेल.
आपण सर्वानी बुकिंग करीता खालील नमूद दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

