अब्दुलवाजीब इस्माईल शेख, रुपाली अविनाश कांबळी, दीक्षा दीपक सुर्वे जिल्हास्तरासाठी पात्र
मालवण : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज रेकोबा हायस्कूल याठिकाणी संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील मुले कॅरम या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. अब्दुलवाजीब इस्माईल शेख याने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर 19 वर्षाखालील मुली गटात कु. रुपाली अविनाश कांबळी यांनी उपविजेतेपद मिळवले. तर कु. दीक्षा दीपक सुर्वे यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला. सदर तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे लाभले.

