काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ उर्फ नाथा वालावलकर
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच क्रियाशील राहिलो आहे. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून गावातील इतरही प्रमुख पदाधिकारी ही आमच्या सोबत मोठ्या संख्येने राहिले. वालावल ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यही काँग्रेसचेच निवडून ही दिले. परंतु बदलत्या राजकारणाचा विचार करता गावातील युवा वर्गाच्या नेतृत्वात विकास मोठ्या प्रमाणात घडून आणता येईल या उद्देशाने दोन पावले मागे घेत देशाच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या नेतेमंडळींचा वरदस्त गावातील युवा पिढी सोबत आहे असे जाणवल्याने त्यांच्यावर विश्वास टाकला. गावात अधिकाधिक विकास हे धोरण ठेवून गावातील युवा वर्गावर पुन्हा एकदा आपल्यासोबत असलेल्या जुन्या जाणत्या मंडळींचा समवेत संघटनात्मक कार्य करून गावातील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. आय. वाय. शेख यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. इरशाद शेख आणि कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. अभय शिरसाट यांच्या नेतृत्वात संघटना वाढवून पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार. असे
असे काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ उर्फ नाथा वालावलकर यांनी सांगितले.

