Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

वैभववाडी बस स्थानक येथे अतिरिक्त वाहतूक नियंत्रक मिळावा

वैभववाडी बस स्थानक येथे अतिरिक्त वाहतूक नियंत्रक मिळावा

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांच्याकडे मागणी

वैभववाडी/प्रतिनिधी: वैभववाडी बस स्थानक येथे दुसरा वाहतूक नियंत्रक ताबडतोब मिळावा अशी मेलव्दारे मागणी राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक संदिप घोडे यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्ष प्रा. एस‌. एन. पाटील, संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.
वैभववाडी तालुक्याची निर्मिती होऊन ४० वर्षे झाली तरीही वैभववाडी तालुक्याची संपूर्ण एसटी वाहतूक व्यवस्था कणकवली आगारावर अवलंबून आहे. अनेक वर्षे वैभववाडी येथे एसटी थांबा हा कोणत्याही सोयीसुविधा नसलेल्या एका निवारा वजा शेडमध्ये होता. पाच-सहा वर्षांपूर्वी महसूल विभागाची इमारत व जागा राज्य परिवहन महामंडळाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला एसटी थांब्याचे स्वरुप प्राप्त झाले. सुरुवातीपासून येथे एकच वाहतूक नियंत्रक असल्यामुळे सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत प्रवासी ग्राहकांना सेवा मिळत होती. त्यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या एसटी प्रवासी ग्राहकांची गैरसोय होत होती.
याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने आपल्या विभागाशी संपर्क साधून, पत्रव्यवहार करुन तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. ब-याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वैभववाडी येथे दि.५ सप्टेंबर, २०२४ पासून दुसरा वाहतूक नियंत्रक देण्यात आला होता. परंतु अचानकपणे गेल्या दोन महिन्यांपासून दुसरा वाहतूक नियंत्रक बंद केल्याने एसटी प्रवासी ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत एसटी प्रवासी ग्राहकांच्या तोंडी आणि लेखी तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडे आल्या आहेत. वैभववाडी येथे ताबडतोब दुसरा वाहतूक नियंत्रक मिळावा अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने रा.प. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री.संदिप घोडे यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.

ruchira top