कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील जि. प. शाळा पिंगुळी सराफदारवाडी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकाच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुडाळ यांच्याकडे शिक्षक मागणी बाबत निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषद शाळा पिंगुळी सरफदार शाळा ही प्रधानमंत्री श्री योजनेमध्ये आहे. शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून पटसंख्या ९२ आहे. शाळेमध्ये जिल्ह्यांतर्गत झालेल्या बदली मध्ये २ स्त्री शिक्षक नेमण्यात आले, आणि आधी कार्यरत असलेले दोन स्त्री शिक्षक मिळून चार शिक्षक शाळेमध्ये कार्यरत आहेत. तरी शाळेच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने आणखी शिक्षकांची गरज असल्यामुळे शिक्षक मागणी अर्ज गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली असून एक पुरुष शिक्षक मिळावा अशी मागणी लेखी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी जि. प.शाळा पिंगुळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक उपस्थित होते.

